किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
स्वातंत्रदिनाच्या पुर्वसंधेला अकोला जिल्ह्यातील अकोला-वाशीम रोडवर कापशी येथील सावित्रीबाई विद्यालय येथे देशाच्या ७५ व्या स्वातंत्रदिना निमित्त ग्रामिण भागातील शेतकरी कुटूंबातील अतिशय गरीब विद्यार्थी मुला-मुलींना शिवसेनेचे राजेश बुंदेले तसेच मानव मोटर्स अकोला व काही शिक्षक वृंद यांच्या आर्थिक मदतीतून गणवेश वाटप करण्यात आले. विशेष बाब म्हणजे सावित्रीबाई फुले विद्यालयानी पातुर तालुका विकास मंचाच्या पदाधिकारींना सन्मानित करून त्यांच्या शुभहस्ते उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना गणवेश प्रदान केले.सावित्रीबाई फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र सोळंकी सर यांनी केलेल्या प्रस्तावनेत उपस्थितांना विद्यालया विषयी माहिती दिली तसेच पातुर तालुका विकास मंच यांच्या कार्याविषयीची माहिती देऊन उपस्थितांचे स्वागत करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
माहिती देताना ते खूप भावुक झाले होते. पातुर तालुका विकास मंचचे किरणकुमार निमकंडे यांनी निष्काम भावणेने विकासात्मक दृष्टीकोन घेवून काम करणा-या पातुर तालुका विकास मंचच्या कार्याबद्दल माहिती दिली.विद्यार्थ्यांनी सरळ मार्गाने चालने व आयुष्यात खोटे न बोलने,गुरूजनांचा,आई वडीलांचा,वडीलधारी मंडळींचा आपल्यापेक्षा लहान असणा-यांचा नेहमी आदर करून सन्मान करण्याचा मूलमंत्र विद्यार्थ्यांना दिला.कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून वसंतराव चतरकर,विशेष अतिथी राजकुमार बुंदेले,प्रमुख अतिथी किरणकुमार निमकंडे,कैलासराव चतरकर,केंद्र प्रमुख ठाकरे सर,पुरूषोत्तम केदार,प्रदीप ताले,गुजरकर सर,चव्हान सर,युवासेना शहर प्रमुख योगेश फुलारी,सामाजिक कार्यकर्ते महेश बोचरे,रणजीत गाडेकर,अजित अल्हाट,राजू वाघमारे आणी गावातील प्रतिष्ठीत मंडळी व शिक्षकवृंद उपस्थीत होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे कर्मचारी शिक्षिका मंगला अवचार,मंदा सरपाते,किरतकर सर ,निलेश चतरकर,संतोष चतरकर,अरूण बोराडे यांनी विशेष प्रयत्न केले.सुत्रसंचालन हिना शर्मा तर आभार प्रदर्शन संगिता रेवसेकर यांनी केले.