संघटनेच्या पदाधिका-यांनी घेतला समाजसेवेचा वसा…
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : आपले कर्तव्य आपला ध्यास.. महाराष्ट्र पोलिस बाॅईज संघटना आपला विश्वास…! महाराष्ट्र पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना खुप हालअपेष्टा सहन कराव्या लागतात महाराष्ट्र पोलिस बाॅईज संघटना ही त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना असुन संघटनेची स्थापना 2013 साली मा. रवि वैद्य यांनी केली आहे आणि हिच संघटना पातूरात असावी हा विचार समोर ठेवून तसेच समाजसेवेचा ध्यास घेऊन नुकतेच जिल्हाध्यक्ष निलेश किरतकार यांच्या मार्गदर्शनात पोलिस बाॅईज असोसिएशनची पातूर तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली होती.या तरुणाचा समाजसेवेचा ध्यास व अन्याया विरुध्द लढण्याची तळमळ पाहुन पातुरचे ठाणेदार हरिष गवळी यांनी या युवकांचा स्वातंत्रदिनानिमित्त सत्कार केला. यामध्ये महाराष्ट्र पोलिस बॉईज असोसिएशन पातूर शहर विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष अर्जुनसिंह अजयसिंह गहिलोत तसेच उपाध्यक्षपदी अविनाश सुरेश पोहरे, सचिव कु. कोमल सुरवाडे, सहसचिव सतिश कांबळे, प्रसिद्धी प्रमुख अतुल भांगे, तालुका संघटक शुभम शेवलकार ,सरचिटणीस निरज कुटे,कोषाध्यक्ष सुमेध शेगोकार ,पातूर शहर युवक आघाडी कार्यकारणी मध्ये तालुका अध्यक्ष प्रभुदास बोंबटकार,उपाध्यक्ष सुनिल गाडगे,सचिव पंकज पोहरे,सहसचिव अविनाश गवई, प्रसिद्धी प्रमुख निखिल उपर्वट, तालुका संघटक राहुल वाघमारे , सरचिटणीस पवन तांबे, कोषाध्यक्ष तुषार सिरसाट आदी पदाधिकार्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन ठाणेदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला ठाणेदार मा.हरिष गवळी,प्रदीप काळपांडे, निलेश राठोड , वनिता खंडेराव, श्रीधर पाटील,निलेश भगत, शिवकुमार वर्मा मेजर, योगेश गेडाम, मनोजसिंह ठाकूर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.