सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर : तालुक्यातील हिवरा आश्रम दिनांक-15 ऑगस्ट 2021ठिकाण-ग्रामीण रुग्णालय,हिवरा आश्रम वेळ-स.10 ते दु.2 पर्यत रक्तदान करण्याचें अहवान टिम तरूणाई ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान असते,असे म्हटले जाते.मात्र,काही जण रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. तज्ज्ञांच्या माहितीनुसार रक्तदान करण्याचे असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत.रक्तदान केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते, वजन नियंत्रणात राहते आणि चांगले शारीरिक आरोग्य लाभते,असे तज्ज्ञांचं म्हणणे आहे.रक्तदानाच्या प्रक्रियेमुळे रक्तदात्याचे शरीर आणि मन दोहोंवर चांगला प्रभाव होतो.रक्तदान करुन तुम्ही केवळ एखाद्याचे आयुष्य वाचवण्याचे महान कार्य करत नाही तर ही प्रक्रिया तुमच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. रक्तदानामुळे शरीर आणि मन दोहोंवर प्रचंड सकारात्मक परिणाम होतो. रक्तदानाच्या आरोग्यदायी फायद्यांपासून दुर्दैवानं बरेच जण अनभिज्ञ आहेत. त्यामुळे रक्तदानाबाबत जनजागृती होणे गरजेचं आहे.18 ते 60 वर्ष या वयोमर्यादेतील कोणत्याही व्यक्ती रक्तदान करू शकतात.फक्त यासाठी केवळ काही महत्त्वपूर्ण बाबींसहीत निरोगी आयुष्य असणे आवश्यक आहे. पण समजा तुम्ही एखाद्या आजाराचा सामना करत असाल अथवा काही औषधोपचार सुरू असतील तर वैद्यकीय सल्ल्यानुसार रक्तदानाचा निर्णय घ्यावा. शरीरात हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात असल्यास महिलादेखील रक्तदान करू शकतात.मात्र,मासिक पाळी,गरोदर महिला,बाळंतपणादरम्यान महिलांनी रक्तदान करू नये. असे आव्हान
टीम तरूणाई व ग्रामपंचायत हिवरा आश्रम केले आहे.


