पवनसिंग तोडावत
ग्रामीण प्रतिनिधी अंधानेर
कन्नड: कन्नड तालुक्यातील औराळा येथील अशोक भाऊसाहेब जीवरख या शेतकऱ्यांने कर्जबाजारीला कंटाळून शेतात विषारी औषध प्राशन करत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक जीवरखं यांच्यावर महिंद्रा फायनान्सचे घर कर्ज विविध कार्यकारी सोसायटी चे मोठ्या प्रमाणात कर्ज होते.हे सर्व कर्ज कसे फेडायचे या विचारात ते होते.दरम्यान गुरुवारी रोजच्या नित्यनेमाने पहाटे जनावरांचे शेण व चारापाणी करण्यासाठी उठले. काम आटोपल्यावर ते शेताकडे शौचालयास गेले.बराच वेळ झाला तरी वडील घरी का आले नाही.म्हणून मुलगा बाळासाहेब जीवरख शेतात बघण्यासाठी गेला असता त्यांना वडील अशोक जीवरखं मृत्यू अवस्थेत दिसले.या प्रकरणी देवगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.