पठाण जैद
तालुका प्रतिनिधि औसा
औसा : औसा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल बहुरे यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचा पुरस्कार मिळाला आहे. गृह मंत्रालयाच्या वतीने पोलीस खात्यातील गुन्ह्याचा तपासासाठी पुरस्कार देण्यात येतो .गुन्ह्याची चौकशी अत्यंत चांगल्या पद्धतीने केल्यामुळे गृह मंत्रालयाच्या वतीने इन्वेस्टीगेशन अवार्ड साठी त्यांची निवड झाली आहे. राहुल बहुरे हे औसा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. औसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोळेवाडी येथील एका तरुणाचा खून झाला होता. या खूनाच्या गुन्ह्याचा तपास त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने करुन एक वर्षात आरोपीला अटक करुन न्यायालयापुढे उभे केले.तसेच कोरोना संकट काळातही त्यांचे काम कौतुकास्पद होते. बहुरे यांना दि १२ ऑगस्ट २०२१ रोजी च्या पत्रान्वये केंद्रीय गृह मंत्रालयाचे सचिव डि. के. घोष यांनी या अवार्डची माहिती दिली आहे. या पुरस्काराबद्दल राहुल बहुरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.


