गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आत्मा यांच्या वतीने रानभाजी महोत्सव 2021 चे आयोजन करण्यात आले होते. सदर महोत्सवाचे आयोजन पंचायत समिती प्रांगण, तेल्हारा येथे शहराच्या मध्यभागी करण्यात आले होते त्यास तेल्हाराकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत फक्त तासभरातच सुमारे 27 हजार रुपयांची उलाढाल या महोत्सवात झाली.या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखेडे व उद्घाटक म्हणून उत्तम महादेव नळकांडे गाडेगाव येथील देशी वृक्ष लागवड करणारे निसर्गप्रेमी हे लाभले.रानभाज्या ह्या मानवी शरीरात पोषण मूल्य वाढवणाऱ्या असून त्यांचा मानवी आरोग्यावर चांगला परिणाम होतो आणि अशा भाज्या ह्या पावसाळ्यात कुठलेही प्रकारचे बियाण्यांची लागवड न करता तसेच कुठल्याही प्रकारची रासायनिक फवारणी न करता रानभाज्या आपोआप उगवतात. आत्मा अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी उत्पादक गट तसेच सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तेल्हारा तालुक्यातील आदिवासी शेतकरी बांधवांनी या महोत्सवात बत्ताशे म्हणजेच बाष्याचे कोम, फांदीची भाजी, केना, कुंजीर, अंबाडी, आंबट चुका, चिवळ, इत्यादी रानभाज्या शहरातील रानभाज्यांची दर्दी ग्राहक यांना उपलब्ध करून दिल्या. कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखेडे यांनी कोरोना महामारीत जगायचे असेल तर आहार पद्धतीमध्ये बदल करून पारंपारिक रानभाज्या आहारात घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.निसर्गप्रेमी उत्तम नळकांडे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करतांना निसर्गावर मात नाही तर निसर्गाशी मैत्री करा निसर्ग आपल्याला भरभरून देतो असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाला मंडळ कृषी अधिकारी नरेंद्र राठोड गौरव राऊत आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नीलेशकुमार नेमाडे तसेच कृषी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी कृषी मित्र पत्रकार बांधव इत्यादी उपस्थित होते. महोत्सवाचे संचालन निलेश नेमाडे बिटीएम आत्मा यांनी तर आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी राऊत यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विभागाचे सर्व कृषी सहाय्यक गट सहाय्यक यांनी परिश्रम घेतले.


