गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:-तेल्हारा तालुका महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ आढावा बैठक दि.12/08/2021 रोजी तेल्हारा येथे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ गवारगुरू यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष मनोहरराव गोलाईत यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाली. सर्वप्रथम कार्यक्रमाच्या सुरवातीला विदर्भ पंढरी शेगाव गजानन महाराज मंदिराचे विश्वस्त शिवशंकर पाटील तथा तालुका सचिव सुनील तायडे यांच्या वडिलांच्या 4 थ्या स्मृतीदिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमात जिल्ह्याचे कार्याध्यक्ष जेष्ठ पत्रकार मनोहरराव गोलाईत यांनी मोलाचे मार्गदर्शन केले त्यांनी पत्रकारिता करत असताना आलेले अनुभव सर्व पत्रकारांना कथन केले व पत्रकार संघटनेच्या ध्येय धोरण व दिशाबाबत अमूल्य असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्तविक तालुका संघटक प्रा. विकास दामोदर यांनी केले तर सदर आढावा बैठकीस हिवरखेड शहर अध्यक्ष गजानन राठोड, तालुका सचिव सुनील तायडे तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थ गवारगुरू, ता. सह सचिव सागर खराटे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच हिवरखेड शहराध्यक्ष गजानन राठोड यांनी पत्रकारांना आपले लिखाण सतत चालू ठेवावे व पत्रकारिता करताना दबाव मध्ये पत्रकारिता करू नये असे मनोगत सुद्धा व्यक्त केले.कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचालन डी. सि. एन . न्यूज च्या सह संपादिका दीपिका मुराई तर आभार प्रदर्शन डॉ. सुशीर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल इंगोले नंदु नागपुरे प्रामुख्याने उपस्थित होते.