गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा :-तेल्हारा तालुका खरेदी विक्री संघ मर्यादित तेल्हारा या संस्थेवर ७ सदस्यांची अशासकीय प्रशासकीय समिती गठीत करण्यात आली असून मुख्य प्रशासक पदी सौ .अनिता पुंडलिकराव अरबट यांची नियुक्ती शासनाच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
या पूर्वी तेल्हारा तालुका खरेदी विक्री संस्थेने नाफेड करिता खरेदी केलेल्या तूर व हरभरा खरेदीवर योग्य नियंत्रण ठेवले नाही शेतमालाची वेळेत वाहतूक करून नाफेड गोडाउन मध्ये माल पोचविला नाही तसेच काही शेतकरी यांचे माल खरेदीचे रेकॉर्ड नाफेड पर्यंत न पोहोचल्यामुळे हरभरा व तूर यांची रक्कम शेतकऱ्यांना मिळाले नाही अध्यक्ष तथा संचालक मंडळ खरेदी-विक्री सहकारी संस्था मर्यादित तेल्हारा यांना सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तेल्हारा यांनी वारंवार लेखी सूचना देऊनही खरेदीचा ताळमेळ जुळविण्यात आला नाही त्यामुळे यासंदर्भात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे असे नमूद असल्याने व या सर्व प्रकारामुळे शासनाने सदर संस्थेचे सर्व संचालक मंडळ बरखास्त केले होते त्यानंतर शासनाच्या नऊ ऑगस्ट च्या पत्रानुसार व आज दिनांक 11 ऑगस्टला सहायक निबंधक सहकारी संस्था तेल्हारा यांनी दिलेल्या पत्रानुसार तेल्हारा तालुका खरेदी विक्री संघ या संस्थेवर सात सदस्यांची अशासकीय प्रशासकीय समितीचे गठण करण्यात आले आहे यामध्ये मुख्य प्रशासक म्हणून सौ. अनिता पुंडलिकराव अरबट यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच समितीमध्ये सदस्य म्हणून संजय विठ्ठलराव पार्थीकर .विनोद अंबादास बिहाडे .अशोक गोविंदराव नेमाडे, प्रकाश ज्ञानदेव वाकोडे ,सुरेश ज्ञानदेव गिर्हे . रामा दिनकर फाटकर या सात जणांची नियुक्ती करण्यात आली आहे यापूर्वी प्रशासकीय समितीमध्ये शिवसेनेचे तालुकाप्रमुख स्वर्गीय विजय शालिग्राम मोहोड यांचे नाव होते परंतु त्यांचे आजारामुळे निधन झाल्यामुळे त्यांचे नाव वगळून उर्वरित सात सदस्यांची अशासकीय प्रशासकिय समितिची नियुक्ति करण्यात आली आहे. सहाय्यक निबंधक यांनी नवनिर्वाचित प्रशासकीय समितीच्या सदस्यांना पत्र दिले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा. प्रदीपराव ढोले, शेतकरी पॅनल चे अध्यक्ष प्राध्यापक सुधाकरराव येवले, सहकार नेते पुंडलिकराव अरबट डॉक्टर ज्ञानेश्वर तराळे, शिवसेना उपतालुका प्रमुख अजय पाटील गावंडे ,प्रहारचे ज्येष्ठ नेते राजेश खारोडे , एड. गजानन तराळे रविंद्र बिहाडे , ज्ञानेश्वर मार्के , प्रमोद गावंडे ,विजय जायले ,गजानन कडू,प्रकाश वानखड़े ,राजु भाकरे , मोहिन खान , इत्यादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी सहकार पॅनल चे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
तेल्हारा तालुका खरेदी विक्री संस्थेमध्ये शेतकरी बांधवांचे तसेच हमाल बांधवांचे जे प्रश्न प्रलंबित आहेत ते प्राधान्याने तात्काळ सोडविण्याचे प्रयत्न करण्यात येईल .
सौ. अनिता पुंडलिकराव अरबट मुख्य प्रशासक खरेदी-विक्री संस्था तालुका तेल्हारा