आदिवासी मन्नेवार समाज तर्फे आदिवासी क्रांती दिन साजरा.
राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
आलापल्ली 9 ऑगस्ट:- आदिवासी समाज हा समतावादी समाज असून, स्वअस्तित्वावर विश्वास ठेवणारा आहे. परंतु ज्यावेळी परंपरागत स्वातंत्र्यावर आघात झाला, परंपरागत जीवनपद्धती नष्ट होण्याची वेळ आली. त्या त्या वेळी आदिवासींनी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ११ एप्रिल १८५८ रोजी आंबापाणीच्या लढाईत अटक झालेल्या ५७ भिल्ल बहाद्दूरांनी डोक्यावर बंदुकीच्या गोळ्या झेलून स्वातंत्र्यासाठी बलिदानाचा पहिला मान घेतला. यावेळी ४००स्त्रियांना अटक झाली होती. आदिवासींचा इतिहास हा पराक्रमाचा इतिहास आहे. असे प्रतिपादन विलास पोचमपल्लीवार यांनी केले. क्रांती दिवसानिमित्त भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले. 9 ऑगस्ट 1994 या दिवशी संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासी दिवस घोषित केला याच दिवशी 9 ऑगस्ट 1942 ला भारत छोडो आंदोलन संपूर्ण देशात सुरू झाला. या दोन्ही दिवसाचे औचित्य साधून आदिवासी मन्नेवार समाज वतीने आज जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम हे होते. यावेळी अतिथी म्हणून ग्रामपंचायत माजी सदस्य कैलास कोरेंत ,उपसरपंच विनोद आकणपल्लीवार, उपस्थित होते. जल जंगल जमीन यांना माय समजणाऱ्या डोंगर पहाडात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी समाजाचे पर्यावरण रक्षणात मोलाचे योगदान असून आदिवासी समाज समाजाच्या मुख्य प्रवाहात येत आहे. आरोग्य शिक्षण व रोजगारामध्ये समाज एक पाऊल पुढे चालत आहे. असे प्रतिपादन देत जननायक बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतीला मन्नेवार समाजाचे सचिव शामलता कालवा यांनी उजाळा दिला. जागतिक आदिवासी दिनानिमित्त अभ्यासाचे महत्व, व एक पोळी कमी खा पण मुलांना शिकवा असे प्रतिपादन आशिष तोगरवार यांनी व्यक्त केले. आदिवासी समाजावर होतं असलेल्या अन्याया अत्याचाराविरुद्ध आदिवासी समाज एकवटल्याशिवाय राहणार नाही. अन्याय खपवून घेतला जाणार नाही असे अध्यक्ष स्थानावरून सरपंच शंकर मेश्राम यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नागेश रेड्डी, रुपेश बंदेला, रवी चेर्लावार, विनय भूपेल्लीवार, रोहित चेर्लावार, राजस्मित पोचमपल्लीवार, लक्ष्मण गंजीवार, सुधीर गंजीवार, पांडुरंग गंजीवार, राजेश गड्डम, रंजिता पोचमपल्लीवार, मदन भूपेल्लीवार, लक्ष्मी पोचमपल्लीवार, कलावती पोचमपल्लीवार, सुशीला टोम्बर्लावार, मुक्ताबाई दासरवार, पल्लवी गंजीवार, येल्लया सल्लम, लक्ष्मण रेड्डी, मल्लेश दासरवार, रमण जुट्टूवार, गजानन कॊम्पेलि, नागेश कॊम्पेली, साहिल दासरवार, सूर्याताई गंजीवार, मैसम्मा जुट्टूवार, लक्ष्मी गंजीवार, अनिता गंजीवार, दीपक तोगरवार, आशिष परसा, अर्जुन गंजीवार, विनोद चनेल्लीवार, किरण पोचमपल्लीवार, राजसोनु पोचमपल्लीवार, राजकमल पोचमपल्लीवार, इत्यादी असंख्य मन्नेवार समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी क्रांतिवीर बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून, ९ आगस्ट क्रांती दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला बहुसंख्येने समाज बांधव व गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन, प्रास्ताविक भाषण, व आभार राजअनिल पोचमपल्लीवार यांनी मानले.


