गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यात गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीने हाहाकार माजविला असल्याने सर्वच क्षेत्रात विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. तालुक्यातील प्रत्येक गावातून विद्यार्थी तेल्हारा येथे शिक्षणाचे धडे घेण्याकरिता येतो. मात्र सध्या बस फेऱ्या बंद असल्याने खासगी वाहन चालक विद्यार्थ्यांपासून जास्तीची रक्कम उकाडत आहेत.तसेच बस फेऱ्या बंद असल्याने लहान मुले मोटार सायकलचा जास्त वापर करत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच यासर्व अडचणींमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासाकाडचा कल बदलत जात असल्याने त्यांचे भवितव्य अंधाराकडे ओढल्या जात आहे.
तरी आपणास विनंती करतो कि लवकरात लवकर तालुक्यातील सर्व बस फेऱ्या पूर्ववत करून विद्यार्थ्यांचे होणारे आर्थिक तसेच शैक्षणिक नुकसान होणार नाही या गंभीर बाबीकडे बाबीकडे लक्ष द्यावे. आंनी जर आपणास विद्यार्थ्यांच्या आर्थिक तसेच जर शैक्षणिक नुकसानाचे काही काही देणेघेणे नसल्यास याकडे दुर्लक्ष करून असे लिखी स्वरुपात द्यावे. अन्यथा त्वरित बसफेऱ्या सुरु करण्यात याव्या. अन्यथा विद्यार्थी जर आक्रमक झाले तर याला सर्वस्वी आपण जबाबदार राहणार. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य लक्षात घेता तालुक्यात बसफेऱ्या सुरू करा विशाल नांदोकार व समस्त विद्यार्थी विद्यार्थी यांनी तेल्हारा आगार व्यवस्थापक यांना विनंती अर्ज मागणी केली आहे


