अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
आगामी सण उत्सव व लोकसभा निवडणूक सन 2024 मध्ये निर्भयपणे मतदान व्हावे व तसेच कायदा व सुव्यवस्था आणि जातीय सलोखा अबाधित राहावा व शांतता प्रस्थापित राहावी याकरता पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अकोला यांचे मार्गदर्शनाखाली रूट मार्च, शक्ती प्रदर्शन आयोजन 7 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5,: 30 वाजता पातुर पोलीस स्टेशन चे वतीने करण्यात आले होते.यामध्ये 107 बटालियन आर ए एफ हिनोतिया रायसेन, मध्यप्रदेशचे कमांडर जगदीश प्रसाद बलई व सहाय्यक कमांडर अमोल कुमार यांचे मार्गदर्शनाखाली असे आर. ए. एफ चे 2 राजपत्रित अधिकारी व अधिकारी 8 सैनिक 41 असे ५१ जवानासह व बाळापूर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक गोकुळराज तसेच पोलीस स्टेशन पातूरचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके पोलीस स्टेशन पातूरचे अधिक एक अधिकारी व वीस पोलीस अमलदार पोलीस स्टेशन बाळापुर ठाणेदार अनिल जुमडे व एक पोलिस अधिकारी व 9 पोलीस कर्मचारी व पोलीस स्टेशन चान्नी चे ठाणेदार विजय चव्हाण व चार पोलीस अमलदार तसेच पोलीस मुख्यालय अकोला येथील 32 पोलीस आमलदार व सहा मोटरसायकल सह पातुर शहरातून रूट मार्च काढण्यात आला.रूट मार्च पोलीस स्टेशन येथून निघून पातुर आठवडी बाजार रोड, मिस्री शहा बाबा दर्गा, मुजावर पुरा ब्रिज, देवडी मैदान दुसरा ब्रिजवरून मोमीनपुरा, गुजरी लाईन, चौकातून गणपती मिरवणूक रोड वरून, बाळापूरवेस येथुन जवळून भोईपुरा, काशीदपुरा चौक, मिलिंद नगर चौकातून जुने बस स्थानक स्टॅन्ड वरून पोलीस स्टेशनला या रूट मार्च समारोप करण्यात आला आहे.सदर रूट मार्चमध्ये असलेल्या सशस्त्र पोलीस ताफा भव्य रॅली यामुळे पातुर शहरात रूट मार्च प्रभावी ठरला.