दैनिक अधिकारनामा
अकोला : दि.09/02/2024 अकोला येथे वंचित बहुजन आघाडी पातुर शहर च्या वतीने काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम या पक्षातील कर्यकर्ते व मुस्लिम समाज व कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर व युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांच्या हस्ते पक्ष प्रवेश घेण्यात आला.सदर पक्ष प्रवेशाचे आयोजन पातुर शहर अध्यक्ष मोहम्मद जैद, आरिफ खान नसीब खान यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
यावेळी अस्लम खा, शेख जावेद, शेख सिकंदर, शेख अतिक,शेख रिजवान,शेख इरफान, शेख समीर,मोहम्मद दानिश, मोहम्मद साजिद, मोहम्मद इलियास, शेख मुजिद, मोहम्मद अयाज, शेख सोहेल, सय्यद मुमताज, मोहम्मद दानिश यांच्या सह शेकडो मुस्लिम बांधवांनी तसेच विविध पक्षातील कार्यक्त्यांनी श्रद्धेय ऍड. बाळासाहेब आंबेडकर व सुजातदादा आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थित यांच्यावर विश्वास ठेऊन वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्ष प्रवेश केला.यावेळी वंचित बहुजन आघाडी पातुर महासचिव भिमराव पोहरे, संघटक बळीराम खंडारे,उपाध्यक्ष इम्रान शाह,उपाध्यक्ष अब्दुल कलाम,प्रसिद्धी प्रमुख अविनाश पोहरे, निखिल उपर्वट आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


