बापू मुळीक :
तालुका प्रतिनिधी पुरंदर
पुरंदर स्वच्छतेबाबत संपूर्ण देशाला दिशा मिळेल असे काम सासवड नगरपरिषद आणि सासवड नागरिकांनी करावे असी प्रशंसा सासवडचे सुपुत्र सनदी अधिकारी विशाल सोळंकी यांनी काढले. स्वच्छतेबाबत स्वर्गवासी नगराध्यक्ष विद्यमान आमदार चंदूकाका जगताप यांची प्रेरणा असून स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सासवड नगर परिषदेने सलग सहाव्या स्थान मिळवले आहे. 2023 मध्ये देशात सर्वात स्वच्छ शहर म्हणून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. हे अवल स्था नआणि यापुढे कायम राहावे. यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचेही विशाल सोळंकी यांनी स्पष्ट केले आहे. 2023 च्या स्वच्छ सर्वेक्षण अभियाना सासवड नगर परिषदेला मिळालेल्या देशातील सर्वात स्वच्छ शहराच्या प्रथम क्रमांकाच्या मानांकनाबद्दल आमदार संजय जगताप यांच्या संकल्पनेतून जल्लोष स्वच्छता चा सन्मान मात्र जनतेचा हा अनुदत्त साजरा करण्यात आला. याप्रसंगी सनदी अधिकारी सोळंकी विशाल ,मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आनंद निरगुडे ,आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सासवड येथील आचार्य अत्रे सभागृह सासवड नगर परिषदेच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत सासवडच्या जडणघडणीत योगदान असलेल्या आजी-माजी ,नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, शिक्षण मंडळाचे सभापती, सदस्य, आजी माजी मुख्य अधिकारी, विभाग प्रमुख ,कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या कुटुंबीयांना सन्मानित केले. आमदार संजय जगताप मनाले की पालखीच्या स्वच्छतेच्या कर्मचाऱ्यांनी शहर स्वच्छ ठेवून पाया रचला. पुरस्काराने शहराच्या लौकिकाचा कळस रचला .माजी नगराध्यक्ष चंदूकाका जगताप यांची शिस्त महत्त्वाची असून ,हा सासवड सन्मान आहे .सासवडचे सुपुत्र मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आनंद निरगुडे यांनी सासवडमधील जुन्या आठवणींना उजाळा देत यापुढे सासवड करांनी अशीच कामगिरी करावी असे आव्हान केले. आमदारांची विशेष कौतुकायची थाप यावेळी आमदार संजय जगताप यांनी नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचारी यांनी तसेच आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण आणि माजी उपनगराध्यक्ष अजित जगताप यांनी अभियानातील मौलिक योगदान असल्याचे नमूद करत आमदारांनी या गौरवपूर्ण असा उल्लेख करीत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. याप्रसंगी माझी एडवोकेट बापू जगताप, जय पुरंदरे ,आनंदी जगताप ,दत्ता जगताप, प्रमोद जगताप, हेमंत भोगळे ,लता दिवसे ,अडवोकेट कला फडतरे, मीना वढणे, नीलिमा चौखंडे ,मार्तंड भोडे ,माजी मुख्याधिकारी वसंत मेढेकर ,प्रकाश पाटील, शिवाजी गवळी ,एस के देसाई, निखिल मोरे ,मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप आदी उपस्थित होते. महेश राऊत, प्राचार्य नंदकुमार सागर ,अनिल उरवणे ,सागर जगताप यांनी सूत्रसंचालन केले .नंदकुमार जगताप यांनी आभार मानले.