गजानन डाबेराव
ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा :-नांदुरा पोलिसांच्या वतीने दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी ११:१५ ते १२:१५ वाजे दरम्यान नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज जयंती व आगामी लोकसभा निवडणुका ह्या शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडाव्या याकरिता नांदुरा शहरातून नांदुरा पोलिसांनी कुरेशीमोहल्ला व जामामस्जिद अंबादेवी गड- मोतीपुरा मज्जिद- छत्रपती शिवाजी महाराज चौक- सुभाष चौक – मधुबन चौक – डॉक्टर राखोडे यांचा दवाखाना – आठवडी बाजार – मिहानी चौक उस्मानिया चौक या मार्गाने रूटमार्च काढण्यात आला. यामध्ये नांदुरा पोलीस स्टेशनचे ०१ पोलीस निरीक्षक ०३ अधिकारी ५० अमलदार मलकापूर येथील आर.सी.पी पथकाचे ५० अंमलदार हजर होते


