राजपाल बनसोड
ग्रामीण प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : तालुक्यातील मौजा लिंगी ( वाई ) येथील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्याची निवड ही चुकीची असून ज्यांची निवड झालेली आहे, ते सर्व लाभार्थी पक्क्या घरात राहत असून त्यांच्याकडे सिमेंट काँक्रेट स्लॅब ची घरे आहेत. त्यामुळे करण्यात आलेली लाभार्थ्यांची निवड ही आर्थिक देवाण-घेवानातून झालेली आहे असा आरोप अंकुश देवराव सगणे यांनी केला आहे. दिनांक 1 फेब्रुवारी रोजी त्यांनी पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना याबाबत निवेदन दिले आहे लिंगी (वाई) येथील एक व्यक्ती हा मुंबई येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असून त्याला घरकुलाचा लाभ देण्यात आला आहे ,तसेच एका महिलेचे दिग्रस तालुक्याच्या ठिकाणी घर आहे ती देखील लाभार्थी ठरली आहे शिवाय एका व्यक्तीकडे किराणा दुकान आणि ऑटो आहे, त्यालाही लाभ देण्यात आला आहे. त्याचबरोबर इतर दोन जणांना देखील घरकुलाचा लाभ देण्यात आला आहे .विशेष म्हणजे उपरोक्त पाचही लाभार्थ्यांकडे पक्की घरे आहेत असेही निवेदनात नमूद आहे. त्यामुळे या खोट्या लाभार्थी काढून गरजू लाभार्थ्यांची निवड करावी अशी मागणी अर्जदार अंकुश सगणे ,रामराव पवार, प्रवीण रोडे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. सदर यादीला स्थगिती न दिल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर हा मरण उपोषण करण्याचा इशारा ही अर्जदारांनी दिला आहे. ( घरकुल घोटाळ्याची चौकशी करा. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या घरकुल यादीतून लिंगी (वाई )येथील गरजू आणि पात्र लाभार्थ्यांची नावे डावलण्यात आली आहे .याबाबत पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना भेटून आपण चौकशीची मागणी केली आहे .दिग्रस तालुक्यातील कित्येक ग्रामपंचायत मध्ये घरकुल घोटाळ्याची प्रकरणे दिवसेंदिवस उघडकीस होत असल्याच्या बाबीकडे व्हिडिओ यांचे लक्ष वेधले असता त्यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आणि दोषीविरुद्ध कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. भीमराव राठोड – प्रवक्ता समनक जनता पार्टी )