कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
मोहा जे ई.सचिव,ठेकेदार यांच्या संगणमंतानी निधीचा होत आहे अपहार मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष बळवंत मनवर,यांनी केली चौकशीची मागणी मौजा मोहा इजारा रामनगर येथे सुरु असलेले तांडावस्ती मधील सिमेंट कॉक्रीट रस्त्याच्या कामात लाखो रूपयाचा भ्रष्ट्राचार होत असल्याची तक्रार उपविभागीय अभियंता जि.प.बांधकाम विभाग पुसद यांच्याकडे दाखल केली. मौजे मोहा रामनगर तांडा येथे सिमेंट कॅाक्रीट रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असुन त्या करीता शासकीय निधी उपलब्ध झाला असुन त्या ठिकाणी होत असलेल्या कामात शासणाच्या निकषानुसार व इंस्टीमेंट नुसार सदरच्या सिमेंट रस्त्याच्या काम शासकीय ठेकेदाराला न देता खाजगी ठेकेदाराला टेडर्स देऊन अतिशय निकृष्ठ दर्जाचे काम होत आहे. सिमेंट कॉक्रेटच्या रस्त्या काम शासनाने ठरवुन दिलेल्या कोणत्याही नियमाचे पालन होताना दिसुन येत नाही. मोठी गिट्टी जास्तीची व क्रेशरची चुरी,रेती नावाला सुद्धा नाही सिमेंटचे कमी प्रमाणात वापर करून बोगस पध्दतीचे बनवित आहेत.तसेच यापुर्वी दलीत वस्तीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरात या अगोदर तसेच रामनगर तांडा,वस्तीत सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे बांधकाम १वर्षा अगोदर करण्यात आले होते परंतु 1वर्ष पुर्ण होण्यापुर्वीच सर्वच्या सर्व रस्ते उखडुन गेले आहेत सपुर्ण रस्त्याचे बांधकाम ठरवुन दिलेल्या निकषानुसार करण्यात आलेले नसुन त्या संदर्भात मी दिनांक २४/०२/२०१५ रोजी तक्रार सुद्धा दिली होती परंतु मी दिलेली तक्रार अर्जाची अद्याप चौकशी सुद्धा करण्यात आली नाही व सबंधित हेच जे ई,ठेकेदार,सचिव यांच्यावर कार्यवाही करण्यात आली नाही. त्याच प्रमाणे आज रोजी तशाच प्रकारचे सिमेंट कॉक्रेटचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे चालु संबधीत ग्रामपंचायतचे सचिव,जे ई,व ठेकेदार,यांच्या लागेबांध्यातुन टक्केवारी नुसार केवळ ५५/टक्केवारी नुसारच टक्यातच बांधकाम करण्यात येत असुन व संपुर्ण सिमेंट कॉक्रेट निकृष्ट दर्जेचे होत आहे शासणाच्या निधीचा आपहार करून आपले उखळ पांढरे करत आहेत.सदरील रामनगर,मौजे मोहा येथे झालेल्या व सुरु असलेल्या सिमेंट कॉक्रीट रस्त्याची सखोल गुननियंत्रण विभागामार्फत सखोल चौकशी करून दोषी आढळुन आल्यास सचिव व जे .ई .यांना निलबीत करण्यात यावे अशी तक्रार कर्ते बळवंत मनवर मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्याचे प्रदेशध्यक्ष यांनी मागणी केली आहे.सदरच्या दिलेल्या तक्रारीची दोन दिवसाच्या आत चौकशी न झाल्यास लोकशाही मार्गाने उपोषणाचा पवित्रा घ्यावा लागेल असे ही निवेदनात बळवंत मनवर यांनी म्हटले आहे.