भारत भालेराव
तालुका प्रतिनिधी, शेवगाव
शेवगाव :शिक्षकांनी व पालकांनी विद्यार्थ्यांच्या मनावरील दडपण दूर करुन विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबद्दलची अकारण भीती दूर करावी. विद्यार्थी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे गेल्यास यश निश्चित मिळते असे प्रतिपादन आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते यांनी केले.ते आज इ. १० वी च्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी-पालक मेळावा प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते. पुढे बोलताना दसपुते म्हणाले की बदलत्या काळाबरोबरच विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करायची आहे. यावेळी त्यांनी बोर्डाने घेतलेल्या सरमिसळ निर्णयाची माहिती विद्यार्थी व पालकांना दिली. येणारा काळ हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे . विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडावे असे ते म्हणाले. संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येत असतो. मनामध्ये तीव्र इच्छाशक्ती असल्यास तुम्ही यशस्वी होऊ शकता असे ते म्हणाले.यावेळी गणेश टेकाळे बोलताना म्हणाले की पालक मेळावा हा शिक्षक- विद्यार्थी – पालक यांचा त्रिवेणी संगम असतो. यावेळी गोल्हार सर बोलताना म्हणाले की विद्यार्थ्यांचे यश हे विद्यार्थ्यांची संगत व संस्कार यावर अवलंबून असते. यावेळी विद्यार्थिनी कु.तनुजा आढाव, पालक सौ. मधुबाला पवार,शिव अग्रवाल,यांनी आपले विचार व्यक्त केले.व्यासपीठावर प्राचार्य संपतराव दसपुते,उपमुख्याध्यापिका पुष्पलता गरुड, पालक रिजवाना शेख, श्री.कुलट ,जेष्ठ शिक्षक गोविंद वाणी,अविनाश भागवत,शिव अग्रवाल उपस्थित होते.तसेच वैशाली धोंडे, शीला धिंदळे, पंढरीनाथ पल्हारे, स्मिता खळेकर, योगेश तायडे, शिवाजी कातोरे व मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शेळके यांनी प्रास्ताविक पुष्पलता गरुड यांनी तर आभार किसनराव जाधव यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.