दै. अधिकारनामा
पातुर : दि.28 जानेवारी 2024 रोजी पातुर येथे वंचित बहुजन आघाडी पातुर शहर च्या वतीने असंख्य मुस्लिम समाजाचा वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्ष प्रवेश घेण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, पातुर तालुका अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश धर्माळ, तालुका महासचिव शरद सुरवाडे, नबू शाह, तालुका संघटक राजू बोरकर,शहर अध्यक्ष मोहम्मद जैद यांच्या हस्ते पक्षप्रवेश सोहळा घेण्यात आला. यावेळी नदीम शाह,नूर शाह, इरफान शाह, जब्बार शाह, अहमद शाह, शेख ग्यासोद्दीन, शेख सोहेल,अवेज शाह,नफान शाह,शेख गुड्डू, सय्यद निसार, शेख हुसैन, मो. अकील, रेहान शाह, समिर कुरेशी, येजाज कुरेशी, अकबर शाह,नवेद शाह, आरिफ शाह, जुबेर शाह,आसिफ खा, रिजवान खा,फरहान शाह, अजीम शाह, नाजीम शाह, शेख अकील, याकूब खा,समिर शाह, गुड्डू शाह, शाकीर शाह, अस्लम शाह, फुरकान शाह, सिद्दीक शाह, जाकीर शाह,मुजम्मील शाह,बाबासाहेब मुस्लिम दिव्यांग सोसायटीचे अध्यक्ष शेख मोईन,सचिव रब्बानी शाह,कोषाध्यक्ष शेख रेहान, सदस्य अलियार खा, शेख हसन यांच्या सह शेकडो मुस्लिम बांधवांनी श्रद्धेय ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेऊन वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला.सदर कार्यक्रमाचे आयोजन जेष्ठ नेते नबू शाह,उपाध्यक्ष इम्रान शाह यांनी केले.तसेच कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी पातुर शहर चे महासचिव भिमराव पोहरे, संघटक बळीराम खंडारे,सह संघटक सतिश सुरवाडे,सचिव शेख इम्रान, महासचिव योगेश इंगळे, प्रसिद्धी प्रमुख अविनाश पोहरे, पत्रकार निखिल इंगळे, निखिल उपर्वट यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बळीराम खंडारे व आभार प्रदर्शन पातुर शहर अध्यक्ष मो. जैद भाई यांनी केले.