दै. अधिकारनामा
पातुर : भिम नगर येथील रहिवासी कुमारी श्रद्धा दादाराव डोंगरे हिची तलाठी पदी नियुक्ती झाल्याबद्दल वंचित बहुजन आघाडी तर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे, तालुकाध्यक्ष डॉ.ओमप्रकाश धर्माळ,महासचिव शरद सुरवाडे, संघटक राजू बोरकर,नबु शहा, शहराध्यक्ष मोहम्मद जैद,शहर महासचिव भीमराव पोहरे,संघटक बळीराम खंडारे,शहर सहसंघटक सतीश सुरवाडे,प्रसिद्धी प्रमुख अविनाश पोहरे,निखिल उपर्वट आदी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.