अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातुर :- छत्रपती शाहू महाराज संशोधन व मानव विकास संस्था सारथी पुणे महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित एमकेसीएल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा व कुणबी समाजातील लक्षित गटातील युवक व युवतींसाठी व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य यावर प्रशिक्षण पातूर शहरातील एज्युकेशनल कंप्युटर इन्स्टिट्यूट येथे देण्यात येत आहे. तरी मराठा व कुणबी समाजातील युवक युवतींनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान संस्थेतर्फे करण्यात येत आहे.
छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारकरिता आवश्यक कौशल्य व्यक्तिमत्व विकास, इंग्रजी भाषा प्रभुत्व, माहिती व तंत्रज्ञान, डेटा मॅनेजमेंट, टॅली विथ जीएसटी, डेस्कटॉप पब्लिकेशन, हार्डवेअर नेटवर्किंग कौशल्य, वेब डिझाईन, मोबाईल ॲप डेव्हलपमेंट, ऍडव्हान्स एक्सेल, अशा रोजगाराभिमुख एकूण दहा कोर्सचा समावेश आहे. विद्यार्थी आपल्या निवडीचे कोर्स सुद्धा या ठिकाणी निवडू शकतात. तरी मराठा व कुणबी समाजातील वय वर्ष 18 ते 45 वयोगटातील कमीत कमी दहावी उत्तीर्ण यात सहभाग नोंदवू शकतात. सद्यस्थितीत तालुक्यातील एकूण 40 विद्यार्थी विद्यार्थिनीचे प्रशिक्षण या ठिकाणी सुरू असून लक्षित गटातील जास्तीत जास्त युवक युवतींनी निशुल्क कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री दीपक राखोंडे संचालक एज्युकेशनल कंप्युटर इन्स्टिट्यूट पातुर तसेच एमकेसीएल अकोला जिल्हा समन्वयक श्री प्रशांत धर्मेसर यांच्या द्वारे करण्यात येत आहे.