अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातुर – डॉ. एच. एन. सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनाचा समारंभ 26 जानेवारी 2024 रोजी शुक्रवारला संपन्न झाला. प्रजासत्ताकदिनी सकाळी 8 वाजता प्राचार्य डॉ.किरण एस. खंडारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले. तसेच कु.आरती सरप यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. त्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नाटक सादर केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्रांगणात बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किरण एस.खंडारे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मानव्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. चंदन राठोड, ग्रंथपाल प्रा. अतुल विखे, मराठी विभाग प्रमुख डॉ.ममता इंगोले,शारीरिक शिक्षण संचालक डॉ.अनिल देशमुख, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. हर्षद एकबोटे, विज्ञान विभाग समन्वयक डॉ. संजय खांदेल, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.दिपाली घोगरे उपस्थित होते. महाविद्यालयात डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती उत्साहात साजरी झाली. त्या अनुषंगाने सांस्कृतिक स्पर्धा व क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले होते. स्पर्धेतील बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. किरण एस खंडारे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय लोकशाही टिकवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी संविधानाचे पालन करणे आवश्यक आहे यासंदर्भात उद्बोधन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ.चंदन राठोड यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.संजय खान्देल यांनी केले.याप्रसंगी डॉ.रोनिल आहाळे, प्रा. धनंजय काळे,प्रा. अविनाश पवार,प्रा. विवेक डवरे, प्रा.अरविंद भोंगळे,श्री.अनिल चव्हाण,श्री. चंद्रकांत अमानकर तसेचं महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी शिक्षक तसेचं शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.