विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड :उमरखेड वन परिक्षेत्रामध्ये अनेक मोठे वन गुन्हे घडले आहेत याच्या तक्रारी पण मुख्य वनसंरक्षक यवतमाळ व उपवनसंरक्षक पुसद यांच्याकडे करण्यात आलेल्या आहेत परंतु हे वरिष्ठ अधिकारी चौकशी करण्याचे सोडून खालील कर्मचाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याची खात्रीदायक माहिती आहे .वन गुन्हे उघड करायचा प्रयत्न कितीही करा वरिष्ठ अधिकारी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे उमरखेड येथील जागरुक नागरीक व पत्रकार डॉक्टर आंबेजोगाईकर पत्रकार उमरखेड – विजय कदम उमरखेड -राजेश खंदारे ( ज ) -सुभाष ब्राम्हणगाव व पत्रकार विश्वास काळे धानोरा हे 22 जानेवारी 2024 पासून 24 जानेवारी 2024 पर्यंत तहसील कार्यालय उमरखेड च्या प्रांगणात ऑफिस वेळेमध्ये साखळी उपोषण करणार आहेत जर 24 जानेवारी 2024 पर्यंत वनविभागातील चौकशा झाल्या नाहीत व संबंधित दोषी अधिकारी -कर्मचारीवर कारवाई झाली नाही तर 24 जानेवारी 2024 च्या दुपारपासून हे सर्वजण बेमुदत आमरण उपोषणाला त्याच ठिकाणी बसणार आहेत . तशा तक्रारी त्यांनी आज दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी मुख्य वनसंरक्षक वनवृत यवतमाळ उपवनसंरक्षक पुसद उपविभागीय अधिकारी (महसूल) उमरखेड उपविभागीय वन अधिकारी उमरखेड तथा तहसीलदार व ठाणेदार उमरखेड यांना लेखी स्वरूपात माहितीस्तव कळविले आहे . जनतेच्या हितासाठी व शासनाची वन चोरी उघड झाली असतांना ही कार्यवाही थातूर -मातूर झालेली आहे ती वन नियमाप्रमाणे व्हावी .आमच्या वर उपोषणाची पाळी येऊ द्यायची नसेल असे वाटत असेल तर मुख्य वनसंरक्षक यवतमाळ व उपवन संरक्षक पुसद यांनी त्वरीत कार्यवाही करावी अशी मागणी डॉ .आंबेजोगाईकर यांनी अग्निबांणशी बोलला केली .उमरखेड वन परिक्षेत्रामध्ये अनेक गंभीर गुन्हे घडले असून हे गंभीर गुन्हे उघड करून सुध्दा वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांना वाचवण्याचाच प्रयत्न करत असल्याचे आतापर्यत दिसून आलेले आहे .यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी म्हणून डॉक्टर आंबेजोगाईकर यांनी वरिष्ठाकडे वारंवार तक्रारी केल्या परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा प्रकरणात गंभीर पणे चौकशी करण्याचे सोडून वन कर्मचाऱ्यांना वाचवण्याचाच प्रयत्न केलेला दिसत आहे म्हणून 22 जानेवारी 2024 पासून24 जानेवारी2024 पर्यंत ऑफिस वेळेत धरणे आंदोलन व चक्री उपोषणाचे आयोजन करण्यात आलेले आहे व नंतर 24 जानेवारी2024 पासून पुढे आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर आंबेजोगाईकर यांनी अग्निबाण शी बोलताना दिली . यां प्रकरणात काय कार्यवाही होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .


