गजानन डाबेराव
ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा:-नांदुरा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी विविध मागण्यांसाठी सरपंच ग्रामसेवकासह सर्व कर्मचारी२८ डिसेंबर ते २० डिसेंबर२०२३ पर्यंत तीन दिवस काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे यामध्ये प्रथमच ग्रामपंचायत स्तरावर काम बंद आंदोलन करण्यात येत आहे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी संघटना ग्रामसेवक युनियन संघटना सर्व संगणक परिचारक संघटना सर्व तसेच अखिल भारतीय सरपंच परिषद ग्रामपंचायत सदस्य यांनी एकत्रितरित्या विविध प्रलंबित न्याय मागण्यासाठी सरकारचे लक्षवेध करण्यासाठी दिनांक २८ डिसेंबर२०२३ ते २० डिसेंबर २०२३ पर्यंत तीन दिवसाचे ऐतिहासिक काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ग्रामपंचायत विकासाचा महत्वाचा भाग असून सुद्धा ग्रामपंचायत पातळीवर काम करणाऱ्या कर्मचारी यांच्या न्याय मागण्या सातत्याने प्रलंबित ठेवल्या जात आहे. आता वेळ आली आहे सर्वांनी एकत्रित लढा यची तरी नांदुरा तालुक्यातील सर्व कर्मचारी ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी सरपंच संघटना रोजगार सेवक संघटना संगणक परिचारक संघटना यांनी सर्वांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद काम आंदोलनात सहभागी झाले आहेत.