अलिम शाह
तालुका प्रतिनिधी मोताळा
धा. बढे एम. ई. एस चे क्रीडा शिक्षक वैभव मोदे नुकतेच आरएसपी अधिकारी मोताला तालुका समादेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच बुलढाणा जिल्ह्यातील वाहतूक नियंत्रण व रस्ता सुरक्षा जनजागृती तथा सिकिल डिफेन्स करिता पोलिस दल व शिक्षण विभाग अॅड. सीडी अध्यक्ष, नागपूर पोलिस कवायत मैदान बुलढाणा येथे ४ ते १४ डिसेंबरपर्यंत १० दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये प्रशिक्षक शेख, इंगळे मॅडम, साबळे, कड, राखीव पो. नि. तिडके तथा वाहतूक निरीक्षक महाजन यांचे मार्गदर्शनात वरील प्रशिक्षण पार पडले. यावेळी पोलिस उपअधिक्षक सातव बुलढाणा, उपशिक्षणाधिकारी आकाळ, पितांबर महाजन महासमादेशक नागपूर, कैलास घोडे जिल्हा समादेशक, महेश गंधपवाड..उपजिल्हा समादेशक प्रदीप डाबेराव ..यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा पोलिस अधिक्षक सुनील कडासने शिक्षणाधिकारी मुकुद शेंडे आरएसपी आदी उपस्थित होते.









