अनंत कराड
तालुका प्रतिनिधी पाथर्डी.
पाथर्डी येथील एम एम निराळी विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी जिते श्री डमाळे या विद्यार्थिनीची अतिशय कमी वयामध्ये कष्ट जिद्द आणि मेहनतीच्या बळावर महाराष्ट्र राज्य अंडर फिफ्टी क्रिकेटमध्ये निवड झाली असून जिते श्री चे वडील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अहमदनगर विभागात तारकपूर आगार या ठिकाणी एसटी चालक या पदावर काम करत असून. ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा योग्य मार्गदर्शन मिळाल्यानंतर उंच भरारी घेऊ शकतात हे जिते श्री डमाळे या विद्यार्थिनींनी दाखवून दिले आहे या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे या निवडीबद्दल माजी आमदार शिवाजीराव कर्डिले व जय हिंद सेवा फाउंडेशनचे संस्थापक पालवे मेजर यांच्यावतीने जिते श्री चा सन्मान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.









