राजपाल बनसोड
ग्रामीण प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : तालुक्यातील टोपटाकळी या गावातील एका युवकाने झटपट श्रीमंत होण्याचे नादात मोबाईल वर येणारी “आओ ना महाराज रमी खेलो “ही जाहिरात बघून ऑनलाईन जुगार खेळू लागला .अशातच तो दीड लाखाचा जुगार हरल्याने त्याने चक्क गावातील नागरिकांना दीड लाखाचा चुना लावून गाव सोडून पसार झाल्याची घटना पंधरा दिवसांपूर्वी घडली आहे. छोटा व सुखी परिवार असणाऱ्या एका युवकाच्या मागील चार ते पाच वर्षापासून गॅस सिलेंडर शेगडी दुरुस्तीचा व्यवसाय चांगला सुरू असताना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असताना आपल्या दररोज मेहनती मधून त्या युवकाकडे चांगले पैसे येत असताना अचानक मोबाईलवर येणाऱ्या जाहिरातीवर विश्वास ठेवून जुगार खेळू लागला .शिवाय त्यास वरली मटक्याचा शोक जडला. अशातच तो लाखो रुपये हरल्याची व त्याची कसर काढण्यासाठी त्याच्याकडे दुरुस्तीसाठी येणारे शेगडी ,सिलेंडर विकून व गावात बचत गटातील पैसे घेऊन गाव सोडून अंदाजे दीड लाख रुपये चा डल्ला मारून पसार झाला आहे .अनेक कुटुंबाचे सिलेंडर त्याच्याकडे असून त्याने परस्पर विक्री केली व कृप्रावी गाव सोडून पसार झाला असल्यामुळे गावात चर्चेत उधान आले असून काही नागरिक पोलीस स्टेशनला तक्रार देण्याचे तयारीत लागले आहे.









