कैलास शेंडे
शहर प्रतिनिधी, तळोदा
तळोदा: कवयित्री बहिणाबाई चौधरी उ.म.विद्यापीठ अंतर्गत कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर विभागीय हँडबॉल स्पर्धेचे तळोदा महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले. या स्पर्धांसाठी क.ब.चौ.उ.म.वी. क्रीडा मंडळाचे संचालक डॉ.दिनेश पाटील हे प्रमुख अतिथी होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.शी. अध्यापक मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष माननीय भरतभाई माळी हे होते. सदर स्पर्धेत जळगाव, एरंडोल, धुळे व नंदुरबार विभागातील पुरूष व महिला खेळाडू यांचे एकूण आठ संघांनी सहभाग नोंदविला होता. दरम्यान एरंडोल विभागाचे पुरूष व महिला खेळाडू संघ विजयी ठरले. तसेच पुरुषांमध्ये धुळे व महिलांमध्ये नंदूरबार संघ उपविजयी ठरले. यावेळी विद्यापीठातून निवड समिती सदस्य म्हणुन डॉ.अरविंद कांबळे, डॉ.नितीन वाळके, संजय सोनवणे हे उपस्थित होते. तसेच या स्पर्धेसाठी विविध विभागाचे संघ व्यवस्थापक व मार्गदर्शक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य डॉ.हेमंत दलाल यांनी केले. तसेच डॉ.दिनेश पाटील यांनी खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले. तर स्पर्धेचे प्रमूख पंच म्हणुन शिक्षक सुनिल सूर्यवंशी हे लाभले. सूत्रसंचालन डॉ.जे.एन. शिंदे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ.पी.व्ही. तट्टे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील डॉ. एस.आर.गोसावी, डॉ. एस.एन. शर्मा, डॉ.पी.बी.बोबडे, डॉ. एस. आर.चव्हाण, डॉ.एम.एच.माळी, डॉ.जी.एम.मोरे, डॉ. कमलेश बेडसे, डॉ.आर.डी.मोरे, डॉ. मोहन वसावे, डॉ.मुकेश जावरे, डॉ.राजु यशोद तसेच इतर प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्रिडा विभाग प्रमुख डॉ. प्रसाद भोगे व प्रा.निशाद माळी यांनी नियोजन केले.









