बापू मुळीक तालुका प्रतिनिधी पुरंदर,(सासवड)
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शेठ गोविंद रघुनाथ साबळे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय सासवड येथे इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल अंतर्गत ‘उद्योजकता जागृती’ या विषयावर डॉ. मीनाक्षी देवधर – संस्थापक, सोनकन फूड्स, पुणे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी शून्यातून व्ययसाय कसा सुरु करायचा आणि त्याला मोठ्या क्षमतेवर कसा पोहचवायचा याचे मार्गदर्शन विद्यार्त्याना केले. तसेच व्यवसाय सुरु करण्यासाठी असलेल्या गोष्टींची गरज, पैशांची व्ययस्था, व्यवसायाची आखणी कशी करायची आणि व्ययसाय का करायचा याचे महत्व पटवून दिले. हा कार्यक्रम महाविद्यलयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. गणेश निगडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यलयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण, उप प्राचार्या डॉ. स्मिता पवार, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.









