फैय्याज इनामदार.
तालुका प्रतिनिधी जुन्नर
उदापुर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या व्हॉइस चेअरमनपदी नामदेव हरी शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती निवडणूक सभेचे अध्यक्ष अध्यासी अधिकारी डी.एम. डोके यांनी सांगितले.उदापूर येथील विविध कार्यकारी सोसायटीचे गेली अनेक वर्षापासून उल्लेखनीय कामकाज चालू असून गावच्या जडणघडणीमध्ये सोसायटीचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे यात सर्व संचालक व सभासद यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे इथून पुढच्या काळात देखील सोसायटीचे काम असेच अविरत चालू ठेवणार असल्याचे चेअरमन संजय बुगदे यांनी सांगितले.
यावेळी चेअरमन संजय बुगदे,माजी व्हाईस चेअरमन कैलास कुलवडे,तुळशीराम शिंदे,अनिल भुजबळ,संतोष होनराव,नारायण शिंदे,ज्ञानेश्वर चौधरी, प्रकाश शिंदे,गोविंद माळवे,सुभाष कठाळे,सचिव मारुती बनकर,मदतनीस दत्तात्रय बोराडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.शिंदे यांच्या निवड झाल्याने उदापुर गावचे समस्त ग्रामस्थ,शेतकरी,आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.