अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
सिद्धार्थ विहार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पास्टूल येथे ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन साजरा करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.सिद्धार्थ वानखडे होते. प्रास्ताविक प्रा.प्रविन इंगळे यांनी केले.त्यानी पुस्तक वाचन करून बाबासाहेबांचे विचार आपण आत्मसात करू शकतो,असे प्रास्तविकातून सांगितले.प्रा. संगीता तेलगोटे व प्रा.छाया राठोड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.प्रा.कीर्ती किरतकार व प्रा.सनी इंगळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या.विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आपले मत मांडले. कार्यक्रमास प्रा.विनय खंडारे,प्रा. योगेश मेहरे,शिक्षकेतर कर्मचारी व व विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली. सूत्रसंचालन अंजली खंडारे व ऋतुजा कांबळे यांनी उत्कृष्टपणे केले.आभार प्रदर्शन विजेता करवते यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी परिश्रम घेतले.