शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सलग 13व्या वर्षी एल के आर रोडगे प्रिंन्स इंग्लिश स्कूल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम.
सेलू : दि 8. डिसें. जिल्हा परिषद परभणी आयोजित तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन 2023 मध्ये श्रीराम प्रतिष्ठान सेलू संचलित एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल, प्रॉस्पपरस पब्लिक स्कूल व ज्ञानतीर्थ विद्यालयाची चमकदार कामगिरी.बाहेती बियाणी नूतन इंग्लिश स्कूल येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात एकूण 40 विज्ञान प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले होते. सर्व सेलू तालुक्यातून शाळेतील प्राथमिक व माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात प्रिन्स इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी अजित शरद झाडे वर्ग सातवा यांनी सादर केलेल्या प्रयोगाची निवड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी झालेली आहे. या विद्यार्थ्यांनी anti-slip ड्रायव्हर सेक्युरिटी गॉगल हा प्रयोग सादर केला. रात्रीच्या वेळी हे वाहन चालक गाडी चालवताना अचानक झोप लागल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते, अपघात होऊ नये म्हणून हा प्रयोग करण्यात आला. हा चष्मा गॉगल वापरल्यास हे अपघात टळु शकतात.या प्रयोगाला प्रथम क्रमांक मिळाला.प्रिन्स अकॅडेमी चा आरुष कावळे वर्ग सातवा या विद्यार्थ्यांनी अंध लोकांसाठी थर्ड आय कॅप नावाचा प्रयोग सादर करून, अंध व्यक्तींना दिव्य दृष्टी देण्याचा प्रयत्न केला या प्रयोगाचा द्वितीय क्रमांक आला.तर माध्यमिक गटात साहिल विलास राठोड वर्ग नववा गॅस गळती थांबवण्यासाठी ऑर्डिनो प्रोग्रामिंग वापरून प्रयोग सादर केला या प्रयोगाला द्वितीय क्रमांक मिळाला.तसेच शैक्षणिक साहित्य प्राथमिक गटात नारायण चौरे यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक साहित्याला प्रथम क्रमांक मिळाला. या सर्व प्रयोगाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. या प्रयोगासाठी मार्गदर्शक शिक्षक नारायण चौरे, विठ्ठल सरकटे, धम्मदीप ठोके, श्रीकृष्ण खरात, अमित गिराम, सारिका ताठे यांनी परिश्रम घेतले.असेच नवनवीन प्रयोग करण्याची परंपरा डॉ संजय रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम प्रतिष्ठान मधील विज्ञान शिक्षकांनी अबाधित ठेवली आहे.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे, सचिव डॉ सविता रोडगे
प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, एल के आर आर प्रिन्स इंग्लिश शाळेचे प्रिन्सिपल कार्तिक रत्नाला , प्रॉस्परस पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल प्रगती क्षीरसागर, ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शालिनी शेळके व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.


