अशोक कराड
ग्रामीण प्रतिनिधी करंजी,
करंजी: पुणे जिल्ह्यातील श्री क्षेऋ आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर माऊली व श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा इंद्रायणी काठी वसलेले श्री क्षेत्र ज्ञानेश्वर माऊली व त्यांची भावंड तसेच संत तुकाराम महाराज यांचे बीज यांचा पालखी सोहळा उत्सवामध्ये आज दिनांक ८/१२/२०२३ रोजी माऊलीच्या दर्शनासाठी भव्य दिव्य अशी दर्शन रांगेमध्ये श्री भक्तांचे दर्शन उद्या दिनांक शनिवार शुद्ध एकादशी निमित्त दर्शन रांगेचे आयोजन करण्यात आले आहेत. इंद्रायणी मध्ये स्नान करून भाविक भक्त ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनासाठी दर्शन रांगेमध्ये येऊन श्री ज्ञानेश्वर माऊलीचे दर्शन घेतात. या ठिकाणी श्री संत भगवान बाबा वामन भाऊ तसेच नारायण महाराज तारकेश्वर गड महाराष्ट्रातून विविध दिंडीचे आयोजन करून संत मंडळी या ठिकाणी दर्शनासाठी येतात. मुंबई या ठिकाणचे श्री शेत्र रत्नागिरी रायगड तसेच आदिवासी जमात या ठिकाणी साधुसंत आपली दिंडी घेऊन आळंदी येथे ज्ञानेश्वर बीज साठी दिंडीचे आयोजन करून दरवर्षी येत असतात. माऊलीच्या दर्शनासाठी लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी माऊलीचे दर्शन घेण्यासाठी नवरात्र रात्रंदिवस दर्शन रांगेत उभे असतात आणि ज्ञानेश्वर माऊलीचे दर्शन घेऊ त्या माऊलीचा आशीर्वाद वर्षासाठी आपल्याबरोबर घेऊन जात असतात असे श्री संत साधू तसेच भाविक मंडळी या दर्शनासाठी दरवर्षी नेहमीप्रमाणे आळंदी येथे इंद्रायणी मध्ये स्नान करून ज्ञानेश्वर माऊलीचे व देहू या ठिकाणी संत तुकाराम महाराज माऊली चे दर्शनासाठी दरवर्षी येत असतात. श्री संत ज्ञानेश्वर माऊलीचा दर्शन घेऊ त्यांचा आशीर्वाद नेहमीप्रमाणे आपल्याच बरोबर घेऊन जातात असा हा सोहळा महाराष्ट्रातील एकमेव सोहळा आहे. महाराष्ट्रामधील सर्वात नाव दिले असे देवस्थान आळंदी श्री संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी लिहून सर्व भक्तांना समाजामध्ये कशाप्रकारे वागायचे आहे याचे मार्गदर्शन केलेले आहे अशा महान थोर थोर पुरुषांना सर्वांच्या वतीने दर्शन रांगेचा आनंद घेतला जातो आणि ज्ञानेश्वर माऊली तुकाराम माऊली नावाने जयघोष केला जातो.


