शुभम गावंडे
ग्रामीण प्रतिनिधी बोरगाव मंजू
बोरगाव मंजू . शिव सेना ऊबाठा गटाचे वणी ते निपाना रस्ता दुरुस्ती मागणी साठी वणी रंभापुर बस थांब्यावर साखळी उपोषण करण्यात येत आहे. वणी ते निपाना रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.अनेकदा निपाना येथील ईगल कंपनीच्या अधिकाऱ्यांना रस्ता दुरुस्त करण्या साठी कधी लेखी तर कधी तोंडी तक्रार दिली असून सदर कंपनीणा निवेदन देण्याचे कारण वणी लगत राष्ट्रीय महामार्गचे चौपदरी करण्याच्या काम साठी कंपनीच्या जड वाहनाची ये जा होत असते त्या मुळे रस्ता पूर्णता उखळला असून परिसरातील नागरिकांना येजा करण्या साठी जीव धोक्यात घेऊन येजा करावी लागत आहे उखडलेल्या रस्त्या मुळे कित्येक प्रवाशांचे जीव थोडक्यात वाचले आहेत रस्ता डांबरीकरण करण्या करिता व राष्ट्रीय महामार्ग क्र 6 वर वणी फाटा येथे क्रॉसिंग असल्या मुळे गतीरोधक बसविण्यात येण्या करीता शिव सेना तालुका सचिव योगेश बोधडे यांनी वणी फाटा येथे सकळी उपोषण सुरू केले आहे.

