बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
दौंड: आजच्या या धावपळीच्या जिवनामध्ये नातेसंबंध ऐकीकडे संपत चाललेले असताना खानवटे गावातील झोंड परीवार यास अपवाद ठरले आहेत. येथील 83 वर्षाच्या आजोबांची भाऊबीज मात्र धुमधडाक्यात साजरी झाली आहे. दि. 17 रोजी सायंकाळी खानवटे तालुका दौंड येथील 83 वर्षांचे आजोबा म्हणजेच श्री भानुदास कृष्णाजी झोंड यांचे घरी आज भाऊबीजचा कार्यक्रम संपन्न झाला. या भाऊबीजीच्या कार्यक्रमाला त्यांचे एकूण 109 नातेवाईक जमा झाले होते. बहिणी 6 भाऊजय 1 मुलं- मुली 4 भाचे- भाच्या 27 पुतणे 4 पुतण्या 7 जावई 5 नातवंडे 40 परतुंडे 6 असा मोठा गोतावळा आजोबां भानुदास झोंड यांचा जमा झालेला आज पाहायला मिळाला. यावेळी आजोबा भानुदास झोंड म्हणाले की माझे एवढे नातलग जमा झालेले पाहून माझं मन भरून आले असून मला आज अतिशय आनंद झालेला आहे.आणि हा माझा परिवार अतिशय सुखी राहावा एवढीच परमेश्वराकडे माझी ईच्छा आहे. आलेल्या सर्व 6 बहिणींना देखील आनंद अश्रू आणावर झाले.आणि आमच्या या भावाला दिर्घ आयुष्य लाभावे आणि प्रत्येक वर्षी आम्ही भाऊबीजेचे औक्षण करायला येऊन शंभराव्या भाऊबीजेचे औक्षण आमच्या हातुन भावाचे व्हावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.यावेळी ऐकत्र आलेला सर्व परिवार आनंदी पाहायला मिळाला.आणि सर्वांनी एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला. या भाऊबिजेच्या कार्यक्रमाचे नियोजन खानवटे विकास सोसायटीचे माजी चेअरमन बापूराव झोंड, बाळासाहेब झोंड, दत्तात्रय झोंड, कुलदीप झोंड, माजी सरपंच राजेंद्र झोंड, संदीप झोंड यांनी केले होते.


