अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातुर: स्थानिक डॉ.एच.एन. सिन्हा महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच तहसील कार्यालय पातुर यांच्या सहकार्याने महाविद्यालयात मतदार जागृती व नवमतदार नोंदनी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किरण खंडारे होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार श्री अजय तेलगोटे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. किरण खंडारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे आपल्याला मुलभूत अधिकार प्राप्त झाले आहे त्यात देशातील सर्व नागरिकांनी मतदानाप्रती जागृत राहून मतदान करणे तसेच विद्यार्थीनी मतदार नोंदणी करणे अनिवार्य असल्याचे प्रतिपादन केले.नायब तहसीलदार श्री अजय तेलगोटे पातुर यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीचे महत्त्व आणि लोकशाही टिकवुन ठेवण्यासाठी मतदानाची आवश्यकता विद्यार्थ्यांना पटवून दिली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंतर्गत गुणवत्ता शाश्वती कक्ष समन्वयक डॉ.संजय खांदेल यांनी केले तर संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. चंदन राठोड यांनी केले आणि आभार प्राध्यापिका उज्वला मनवर यांनी मानले.या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रम अधिकारी तथा राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दिपाली घोगरे रासेयो स्वयंसेवक- स्वयंसेविका व महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.तसेच या शिबिरामध्ये महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांनी मतदार यादीमध्ये आपले नाव नोंदविण्यासाठी मतदार नोंदणी फॉर्म भरून दिले.