अतिश वटाणे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
बिरसा मुंडा सार्वजनिक उत्सव समिती उमरखेडच्या वतीने राष्ट्रीय जनजाती गौरव दिनाचे औचित्य साधून भगवान बिरसा मुंडा जयंती आदिवासी बांधव व सर्व नागरिकांनी उत्साहात साजरी केली या वेळी एक तिर एक कमान, सारे आदिवासी एक समान या नाऱ्याने परिसर दणाणून गेला होता. तालुक्यातील विविध गावात आदिवासी बांधव, महिला यांनी ठिकठिकाणी वाजत गाजत जयंती साजरी केली.कोरटा वन येथे भगवान बिरसा मुंडा यांचे पूजन करण्यात आले.तालुक्यातील ग्रामीण ,शहराच्या मुख्य मार्गांवरून नागरिक, महिला -भगिनीं यात सहभागी झाल्या.मोजा कोरटा येथे आकर्षक चित्ररथ, झकी,पुष्पवृष्ठी यांनी लक्ष वेधून घेतले. पारंपरिक वेषातील आदिवासी बांधवांच्या नृत्याने रंगत आणली. ढोल, ताशा, बँड च्या तालावर थिरकणाऱ्या पाऊलांनी या उत्साहात भर घातली.भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा, त्यांचे विचार प्रदर्शीत करणारा चित्ररथ बिरसा मुंडा यांच्या कार्यकर्तृत्वला उजाळा देणारा ठरला यावेळी कोरटा( वन )येथील एकलव्य युवा संघटना , बिरसा ब्रिगेड , भूमीपुत्र कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रन्तिसूर्य बिरसा मुंडा जयंती कोरटा (वन ) तालुका उमरखेड येथे घेण्यात आली.बिरसा मुंडा जयंती दिनाचे औचित्य साधून उमरखेड येथे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना करीता बिरसा मुंडा सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे उमरखेड चे अध्यक्ष विठ्ठलराव पोटे सर, कैलास गारोले, शारदा वानोले मॅडम तसेच आदिवासीं कृती समिती उमरखेड यांचे सह समितीच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. या वेळीयांचे सह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.भगवान बिरसा मुंडा यांनी जो क्रांतीच्या विचार दिला त्यातून आदिवासीं समाजाचा विकास होण्यास प्रेरणा प्राप्त होते माजी आमदार उत्तमराव इंगळे
आदिवासी, शेतकरी,कष्टकरी व सर्वसामान्य माणसाचे देश उभारणीत योगदान फार मोठे आहे.जननायक, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांनी क्रांतीचा जो विचार दिला, विकासाची जी दिशा दाखवली त्या मार्गाने आदिवासी समाजाला सामाजिक,आर्थिक,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्याची प्रेरणा प्राप्त होत असते.
15 नोव्हेंबर हा क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस राष्ट्रीय जनजाती गौरवदिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी सर्वांना सहभागी होता यावे म्हणून शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय शासनाने घेतला त्याबाबत शासनाचे आभार त्यांनी मानले.