अंकुश जागले
तालुका प्रतिनिधी, शहापुर
पक्षी तज्ञ डॉ. सलीम अली तसेच निसर्ग अभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधुन दरवर्षी प्रमाने या ही वर्षी आऊल कंझर्वेशन फाऊंडेशन च्या वतीने पक्षी निरिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये तब्बल १५८वेगवेगळ्या प्रकार चे पक्षी आढळून आले आहेत मागच्या वर्षी च्या तुलनेत ३२जादा पक्षांची अधिकृत नोंद झाली आहे. पक्षी प्रेमी व अभ्यासकांना दरवर्षी मिळणारी पर्वणी असते. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वनविभाग नेहमीच पुढाकार घेऊन सहकार्य करत असते. वन्यजीव विभाग आणि पक्षी मित्रांनी तानसा अभयारण्यात केलेल्या पक्षी निरिक्षणात दुर्मिळ व संकटग्रस्त पक्षी आढळून आले. यात, दलदली ससाने, माशीमार, धोबी ,तिरचिमण्या, वनपिंगळा काळा कारकोचा कर्णा मलबारी शिंगळा सर्पगरुड तुरेवाला, अशा अनेक प्रजातींची नोंद झाली.अजून ही पक्षांचे आगमन चालू आहे त्यामुळे पक्षांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विविध प्रजातींसह भृंगराज, हळद्या, पोपट, घार, पाणकावळे, पाकोळी, गरूड, तिसा, इत्यादी सामान्य पक्षांची नोंद देखील झाली असल्याचे पक्षीमित्र रोहिदास डगळे यांनी सांगितले. आपल्या कंझर्वेशन फाऊंडेशन च्या पुढाकाराने योगेश शिद, अविनाश भगत, शाहीद शेख, शंतनू डे, प्रथमेश देसाई, भरत वाख,दामु धादवड,अक्षय गहिरे, व रोहिदास डगळे, यांनी पक्षीनिरीक्षणात सहभाग घेतला.