अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची १४८ वि जयंती मोठ्या उत्साहात पातुर शहरात साजरी करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते त्यांची जयंती संपुर्ण देशात अदिवासी बांधव साजरी करतात. बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड राज्यातील रांचीजवडील लिहुतु या आदिवासी गावात झाला. ब्रिटीशांच्या राजवटीत आदिवासींच्या वनसंपती वर असलेल्या अधिकारावर बाधा येण्यास सुरुवात झाली तेव्हा त्यांनी इंग्रजांविरुद्ध मोठा लढा उभारला होता. क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती निमित्त पातुर येथे मुंगसाजी माऊली मंदीर येथे प्रथम धरती आबा क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांना पातुर तालुक्यातील सम्पूर्ण आदिवासी बांधवांनी अभिवादन केले तेथून भव्य अशी मोटार सायकल रॅली काढण्यात आली. सदर रॅली ही मुंगसाजी माऊली मंदिर पासून सुरू होऊन गुरुवार पेठ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. तसेच छत्रपती संभाजी चौक येथे महात्मा फुले स्मारक जवळ पुष्प अर्पण केले तेथून मोटार सायकल रॅली ही शिव नगर मुंगसाजी माऊली मंदिर येथे समाप्त झाली. कार्यक्रमाचे आयोजन सुधाकर शिंदे, गोपाल लोखंडे,गजानन झाडे,दत्ता पांडे,गोलू मेटांगे,
कार्यक्रमाला उपस्थित प्रीतम खुळे, देवलाल डाखोरे, श्रीकांत करवदे सरपंच कोसगाव, शंकर देवकर सरपंच गोंधळवाडी, गजानन डाखोरे सरपंच नवेगाव, संतोष तिवाले सरपंच आस्टूल, विष्णू ठाकरे सरपंच चोंडी, साईनाथ देवकर सरपंच आधारसांगवी,प्रमोद खुळे नागपूर,रामचंद्र लोखंडे, गुलाब ठाकरे, सुखदेव शिंदे सर, हरिदास करवते , गजानन करवते,प्रकाश डाखोरे, प्रकाश चौरे,राजेश भोकरे, हरिदास गोदमले,जनार्दन खुडे, मनोहर भाऊ शिंदे कृषीउत्पन्न बाजार समिती सदस्य,सुहास देवकर, देविदास पांडे, नवनाथ पवार, विश्वनाथ देवकर, जगदीश धंनदरे, सचिन तिवाले, सीताराम शिंदे, विनोद ससाने,देवा चवरे,गजानन झाडे,अजय भोकरे, नवनाथ देवकर, नारायण पांडे, सोळंके भाऊ, संतोष गिऱ्हे, गोलू मेटांगे, सचिन लाठड, रवी तीवाले, सतीश नाईक,अक्षय करवते, सागर लठाड, दिनेश काळपांडे , सनद गवई,विशाल शिंदे,आकाश करवते, रमेश देवकर, गणेश ठाकरे,आदी उपस्थित होते.