कैलास खोट्टे
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे १५नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजताआदिवासी समाजाचे दैवत क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांची१४७ वी जयंती उत्सवात साजरी करण्यात आली.बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील उलिहातू या गावी १५ नोव्हेंबर, १८७५ रोजी झाला. त्यांचे शिक्षण जर्मन मिशननरी स्कूल मध्ये झाले. सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहण्याचा बिरसाचा स्वभाव होता. त्यामुळे तरुण वयात त्यांनी समवयस्क आणि समविचारी सहकार्यांचे संघटन केले. यावेळी सोनाळा गावचे जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी प्रणव घोडेस्वार यांनी क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून चंदन कोहरे यांनी दीप प्रज्वलन केले. तसेच भगवान बिरसा मुंडा यांच्या जिवनावर कु.अनुराधा वाघाडे हिने माहिती दिली.कार्यक्रमाचे आयोजक आदिवासी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चंदन कोहरे, साहेबराव वाघाडे उमेश ठाकरे ,सागर ठाकरे,अक्षय शेन्द्रे , गजानन ठाकरे,वासुदेव परसमोडे,अजय नेवारे ,सुरज शेन्द्रे, सविता साहारे ,पंचंफुला राऊत , कविता ठाकरे, संगिता सोनोने, दिपमाला नेवारे, निर्मला शेन्द्रे आणि असंख्य आदिवासी गोवारी समाज बांधव उपस्थित होते.