अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघातर्फे ज्युनिअर विश्व बॉक्सिंग स्पर्धा आयोजिले आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड चाचणी भारतीय बॉक्सिंग महासंघातर्फे, राष्ट्रीय बॉक्सिंग अकादमी रोहतक (हरियाणा)येथे 7 ते 10 नोव्हेंबर 2023 दरम्यान आयोजित केले आहे या निवड चाचणी करिता जिल्ह्यातील पातुरचे अक्षय टेंभुर्णीकर यांची तांत्रिक अधिकारी म्हणून निवड झालेली आहे. भारतीय बॉक्सिंग महासंघाने तसेच महाराष्ट्र बॉक्सिंग संघटने तर्फे महाराष्ट्रातून एकमेव अक्षय टेंभुर्णीकर यांची तांत्रिक अधिकारी म्हणून निवड झालेली आहे. व ही पातूर साठी फार अभिमानाची बाब आहे. अक्षय टेंभुर्णीकर यांनी याआधी अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये तांत्रिक अधिकारी तसेच पंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावलेली आहे व ह्यामुळेच त्यांची विश्व बॉक्सिंग स्पर्धेच्या भारतीय संघ निवड चाचणी करिता तांत्रिक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीकरिता सर्वत्र कौतुक होत आहे व यांचे श्रेय महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष रणजीत सावरकर, सचिव डॉक्टर राकेश तिवारी, ROC चेअरमन एड. बी. जी. आगवणे, ROC सचिव श्री. राजन जोथाडी, श्री मिलन वैद्य, विभागीय सचिव एड. विजय शर्मा, जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच मुख्य प्रशिक्षक डॉ. सतीशचंद्र भट, प्रशिक्षक श्री प्रमोद सुरवाडे तसेच आई व मित्र मंडळी यांना देतात.