तालुकाध्यक्ष डॉ.ओमप्रकाश धर्माळ यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षप्रवेश
दै. अधिकारनामा
राजकारणातील सक्रिय राजकीय पक्ष व महाराष्ट्र राजकारणात आगेकुच करून आपले अस्तित्व निर्माण करणारा वंचित बहुजन आघाडी मध्ये बहुजन समाजातील अनेक नागरिक युवक,सामाजिक कार्यकर्ते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणी अंगीकृत करून पक्षप्रवेश करत आहेत.याच पार्श्वभूमीवर आज पातुर तालुका वंचित बहुजन आघाडी वर विश्वास ठेवून व तालुकाध्यक्ष डॉ.ओमप्रकाश धर्माळ यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वंचित समाजातील युवकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.यामध्ये प्रामुख्याने कलाल समाज,मुस्लिम समाज, बेलदार समाज, पाथरवट समाज, यांनी पक्ष प्रवेश केला व यासोबत आणि कुणबी समाज आणि माळी समाज यांनी सुद्धा पक्षप्रवेश केला आहे.यावेळी पातूर तालुक्यातील अंबाशी, बाभूळगाव,आसोला या गावातील नवतरुण व सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
प्रवेशामध्ये प्रामुख्याने अंबाशी येथील श्याम करोडदे यांच्या सोबत मकसूद याकूब पटेल, उकर्डा डोंगे,मनोहर करोडदे, अंबादास गोरे, चेतन लाहोळे, मतीन पटेल,अरविंद करोडदे, गंगाधर मोहाडे,ऋषिकेश करोडदे, हर्षद सलामे,वेदांत करोडदे,शेख जमीर भाई,बाभूळगाव येथील गोपाल गायकवाड यांच्यासोबत किसन खर्डे,पीराजी खरडे, प्रकाश मालठाने, विनोद राऊत, सुमित भालतिलक, मंगेश फाटकर,हर्षल फाटकर, मनोज धाडसे,गोलू पाचपोर यांचा समावेश आहे.असोला येथील संतोष वनारे पाटील यांच्यासोबत शुभम शेवलकर ग्रामपंचायत सदस्य असोला बंडू तेलगोटे ग्रामपंचायत सदस्य आणि जांब येथील रुपेश नवघरे यांनी प्रवेश घेतला.पक्षप्रवेशासाठी वंचित बहुजन आघाडी कडून प्रमुख उपस्थित डॉक्टर ओमप्रकाश धर्माळ तालुकाध्यक्ष,सुनील फाटकर जिल्हा परिषद उपाध्यक्ष, विनोद देशमुख जिल्हा परिषद सदस्य, शरद सुरवाडे तालुका महासचिव,चंद्रकांत तायडे युवक आघाडी अध्यक्ष,राजू बोरकर तालुका संघटक,धर्माची सुरवाडे जेष्ठ कार्यकर्ते,राजेश महल्ले संचालक कृ.उ.बा,दिनेश गवई प्रसिद्ध प्रमुख,अनिल राठोड युवक आघाडी संघटक,रामदास बर्डे तालुका उपाध्यक्ष यांच्यासह उपस्थितांमध्ये विजयकुमार अवचार सरपंच आसोला, प्रवीण दांडगे बाभूळगाव गण अध्यक्ष, अजाबराव गवई,मोहम्मद जैद भाई,एड संदेश धाडसे, रवी धाडसे,पत्रकार अविनाश पोहरे, किसन सुलताने, शैलेश देशमुख,सुदर्शन गाडेकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.