समीर शेख
ग्रामीण प्रतिनिधी अहमदनगर
शेवगाव – तालुक्यातील सुधारित आनेवारी पन्नास टक्क्यांपेशा कमी असून तालुक्यातील शेवगाव,भातकुड़गांव,दहिगाव-ने, ढोरजळगांव शे, एरंडगांव,मुंगी,बोधेगाव या सर्वच महसुल मंडळामधे पाऊस कमी असल्यामुळे खरीपाची पिके वाया गेली असून रब्बी हंगामाची पिके होऊ शकत नाहीत.शेतकरी अडचणीत असून शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असल्यामुळे तालुक्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा,अशी मागणी शेवगाव भाजपच्या वतीने तहसीलदार राहुल गुरव यांना निवेदन देऊन करण्यात आली.त्याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष ताराचंद लोढ़े,महिला आघाडी तालुकाध्यक्षा सौ.आशाताई गरड व इतर पदाधिकारी उपस्थित होते.