मधुकर केदार
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
यंदा राज्यात सरासरी साडे तेरा टक्के पाऊस कमी झाला आहे.यात राज्यातील अनेक तालुक्यांत शेतीला मोठी झळ पोहोचली असून खरिपाबरोबर आता रब्बी हंगाम वाया जात असलेली परिस्थिती आहे.
पाथर्डी तालुका हा राज्यातील नंबर एकचा दुष्काळी तालुका.परंतु राज्य सरकारात काम करणारे भेसळ मंत्री महोदयांनी मिळून एक अध्यादेश जारी केला.ज्यामुळे आमच्या पाथर्डी तालूक्यातील लेकराबाळांच्या शिक्षणावर गदा आली आहे.त्यामुळे आमच्या शेतकरी समाजावर संकट कोसळले आहे.आमच्या वीजग्राहकावर अन्याय झाला आहे.सर्वतोपरी सकल शेतकरी समाजावर अनन्वित अन्याय झाला आहे सदर अध्यादेशामुळे महसुल करातील सूट,वीजबील माफी,शैक्षणिक फीमाफी,अनुदान,कर्ज वसुली स्थगिती आदीं अन्य सवलती आमच्या पाथर्डी तालुक्याला मिळणार नाहीत.कारण नगर जिल्हा हा दुष्काळी यादीतून वगळल्याने पाथर्डी तालुका हा वंचित ठरणार आहे पाथर्डी तालूका हा राज्यातील भयंकर दुष्काळी तालुका असुनही त्याचा समावेश दुष्काळी यादीत करण्यात आला नाही.याचे कारण आम्ही झोपलो आहोत. आणी आम्हाला कुणी लोकप्रतिनिधी उरला नाही.अहमद नगर जिल्ह्यातील आमदार,खासदार काय करत आहेत?
पाथर्डी तालुका हा दुष्काळी आहे.या तालुक्यात सर्व गावांना पिण्याचे पाणी टँकरने पुरवले जात आहेत.अनेक गावाचे पिण्याचे पाणी मिळण्यासाठी टँकर मागणीचे प्रस्ताव प्रलंबीत आहेत.शेतकरी हवालदिल आहेत.शैक्षणिक फी साठी विद्यार्थी मजबूर आहेत.चारा छावणीचे प्रश्न आहेत.वीजबील भरण्याबाबत शेतकरी असमर्थ आहेत.दुष्काळी अनुदानाची कुठलीही शक्यता नाही.शेतसारा भरण्यासाठी कुठलीही परिस्थिती नाही.सकल पाथर्डी तालुक्यातील शेतकरी बँकांचा कर्जदार आहे.त्याच्या परतफेडीचा पर्याय दिसत नाही.पाथर्डी तालुक्यात कुठेही पाऊस झालेला नाही.पहिलेच पीक धोक्यात असतांना दुबार पिकांची कुठलीही संभावना नाही या सर्वच परिस्थितीमुळे आमच्यावर जे संकट कोसळले आहे त्याला कुणी वाली नाही.सरकार,पक्ष यांवर आमचा विश्वास राहिला नाही. या विपरित परिस्थितीत आमचा पाथर्डी तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश केला नाहीतर आम्ही असे आंदोलन करू की सरकार भविष्यकाळात आमच्या तालुक्यावर असा अन्याय करण्याची हिंमत करणार नाही.जर आमचा पाथर्डी तालुका दुष्काळी यादीत समाविष्ट झाला नाही तर येत्या काळात आम्ही कोणत्याही स्वरूपाचे आंदोलन करू याची नोंद घ्यावी.आमच्या आंदोलनामुळे कोणत्याही प्रकारची परिस्थिती उद्भवली तर याला जबाबदार सरकार असेल.


