सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दि. ९ नोव्हेंबर २०२३ बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील पीजी वस्तीगृहाचे कारकून वैजनाथ आनंद काळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अंबाजोगाई शहरातील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय परिसरात असलेल्या पीजी वस्तीगृहाचे कारकून पदावर कार्यरत असणारे वैजनाथ आनंद काळे वय वर्ष ४५ यांनी आज रोजी सकाळी ८:०० ते ८:३० वाजता पीजी वस्तीगृहाच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे रूग्णालयातील इतर विभागाचे डॉक्टर आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अंबाजोगाई शहर पोलिस प्रशासनाने या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जावून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला वैजनाथ आनंद काळे यांनी आत्महत्या का केली असा प्रश्न पोलिस प्रशासनासमोर उभारला आहे. एवढ्या टोकाची भूमिका का घेतली याचे नेमके कारण अद्याप कळालेले नाही.


