माबुद खान
तालुका प्रतिनिधी जिंतूर
जिंतूर : तालुक्यातील मोजे पुंगळा येथील औद्योगिक वसाहतीमधील विद्युत रोहित्र चोरीला गेल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याने विरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिंतूर तालुक्यातील जिंतूर -औंढा रोडवरील पुंगळा येथील औद्योगिक वसाहतीमधील गोविंदा जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी मधील 250 पॉवरच्या विद्युत रोहित्रातील तांब्याचे वायर व ऑईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेण्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. सदरील चोरट्यांनी कंपाऊंडचे लोखंडी जाळी कापून आत मधील डीपीचा पुरवठा बंद करून सदरील डीपी फोडून आत मधील साहित्य चोरून नेले आहे. यामुळे एम,आय,डी,सी मधील उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .या प्रकरणी गोविंदा जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीचे मालक दीपकचंद मोहनलाल लोहिया यांच्या फिर्यादीवरून जिंतूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत तांब्याची वायर व ऑइल असा एकूण अंदाजे ८६ हजार रुपयांचा अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तपास एम.जे. सय्यद सहाय्यक पोलीस निरीक्षक हे पुढील तपास करीत आहेत .