गजानन ढोणे
ग्रामीण प्रतिनिधी बुलढाणा
बुलढाणा : स्थानिक जांभरुण रोड स्थित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय इंग्रजी माध्यम बुलढाणा येथे शालेय दिवाळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. त्यावेळी शाळेचे,लक्ष्मी व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शालेय मुलांना फराळ, नाश्ता, गोड पदार्थाचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांचा शाळेत फटाके फोडून आनंद द्विगुणीत झाला. शिक्षक तसेच विद्यार्थी यांनी एकमेकांना दिवाळीच्या उज्वल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.त्याप्रसंगी शाळेचे प्राचार्य मा. श्री. अविनाश सुरडकर, शिक्षिका कु.कविता भुसारी,कु.कविता शिरसाट, कु.राजश्री अवचार, कु. स्वाती पाटील,कु.सीमा जाधव,कु.संध्या चौथनकर, कु. प्रियंका सुरडकर,कु.विद्या बिडकर, श्रीमती कमल वैद्य इत्यादी मंडळी उपस्थित होते.