व्येकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधी अहेरी
अहेरी सिरोंचा तहसील कार्यालय समोर गेल्या ७ दिवसांपासून शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी उपोषण चालू होते, ह्याची माहिती मिळताच काल सिरोंचा जाऊन माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी आंदोलनकर्त्यांशी बराच वेळ सकारात्मक चर्चा केली, ह्यावेळी शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन राजेंना दिले, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून लवकरच शेतकऱ्यांचे सर्व मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन राजेंनी ह्यावेळी दिल्याने आंदोलकांचे समाधान झाले ह्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले, माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा हस्ते उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना निंबु पाणी पाजून हे आंदोलन संपविले, ह्यावेळी सिरोंचा तालुक्यातील विविध भागांतील शेतकरी तथा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती..


