अलिम शाह
तालुका प्रतिनिधी मोताळा
मोताळा:- आज दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ रोजी मोताळा येथे तहसीलदार यांना निवेदन देऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केले आंदोलन धडाकेबाज आंदोलन,निवेदनात म्हटले आहे की यावर्षी मोताळा तालुक्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अत्यल्प झाले असुन शेती माल हा खुप कमी प्रमाणात झाला. व शेतमालाचे भावसुद्धा कमी आहेत. त्यामुळे शेतकरी हा हवालदिल झाला असुन तो आर्थिक संकटात सापडलेला आहे. सदर बाबीचा विचार करता मोताळा तालुका हादुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दयावी. तसेच शासनाच्या किसान सन्मान योजनेअंतर्गत तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी वंचित राहीलेले असुन त्यांचा या योजनेमध्ये समावेश करून त्यांना तात्काळ लाभ दयावा. तसेच संजय गांधी निराधार, श्रावनबाळ योजनेचे बरेच दिवसापासुन रखडलेले अनुदान दिवाळीपुर्वी तात्काळ लाभार्थीच्या खात्यात जमा करावे. तसेच रेशन माल दिवाळीपूर्वी वाटप करावे जेणेकरून सर्वसामाण्यांची दिवाळी आनंदात जाईल. यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे नया-नाले कोरडे असुन धरणात सुद्धा पाणी कमी असुन धरणातील पाण्याचे नियोजन व्यवस्थित करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दयावेत जेणेकरूण पाणीटंचाई निर्माण होणार नाही.तरी वरील सर्व मागण्यांचा सहानुभुतीपुर्वक विचार करून तात्काळ अंमलबजावणी करून तालुक्यातील जनतेला न्याय दयावा अशी मांगणी या निवेदनातून केली आहे,यावेळी समन्वयक बुलढाणा विधानसभा काँग्रेस गणेशसिंग राजपुत,मोताळा तालुकाध्यक्ष गजानन मामलकर,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अमर कुळे,अवि पाटील, देवराज पाटील, उखा चव्हाण, कैलास गवई, शे. जाबिरभाई, आतिश इंगळे, श्याम कानडजे, संजय किनगे, अभिजित खाकरे, महेंद्र गवई, इरफान पठाण, साहेबराव डोंगरे, जयेश पाटील, ग. म वैराळकर, शे शरीफ, स्वप्निल नारखडे, भास्कर आघाम, ज्ञानेश्वर दिवाणे, संजय पाटील, प्रनवसिंग परमार, संदिप ढकचवळे, आकाश निमसे, उल्हास पाटील, विष्णू शिराळ, वासुदेव कोलते, परमेश्वर पाटील, राहुल घाटे, श्रीराम सपकाळ , सचिन खराटे , भिका घोंगडे, विजय तायडे , यांच्यासह तालुक्यातील असंख्य शेतकरी उपस्थित होते.











