भारत भालेराव
तालुका प्रतिनिधी,शेवगाव
शेवगाव: तालुक्यातील मौजे सोनविहीर येथील काही ग्रामस्थांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळत नसल्याने याचा आर्थिक फटका त्यांना बसत आहे.त्यामुळे अन्न सुरक्षा योजनेचा प्राधान्याने लाभ मिळावा यामागणीचे निवेदन जनशक्ती विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अँड.डॉ.शिवाजीराव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनविहीर येथील ग्रामस्थांनी शेवगाव तहसीलचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांना आज शेवगाव येथे दिले.निवेदनात पुढे म्हंटले आहे की,सोनविहीर येथील काही कुटुंब आर्थिकदृष्ट्या अतिशय गरीब असूनही त्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळत नाही.सदरच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची असून मोलमजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.अन्न सुरक्षा योजनेचा सदरच्या कुटुंबांना लाभ मिळावा याकरिता दि.२६/०१/२०२३ रोजी सोनविहीर ग्रामपंचायतीकडून ग्रामसभेचा ठरावही घेण्यात आला आहे.तरी देखील सदरच्या ग्रामस्थांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळत नसल्याने येथील नागरिकांना नहाक आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.सदरच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेम-तेम असल्याने त्यांना मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करावा लागतो.जर अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळाला तर निश्चित त्यांना त्याचा फायदा होणार आहे.तरी प्राधान्याने सोनविहीर येथील वंचित कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा असेही निवेदनात म्हंटले आहे. निवेदनावर बाबासाहेब टेमकर,काशिनाथ डोंगरे,धोंडीराम अवचित्ते,बाळासाहेब गायकवाड,आबासाहेब काकडे,मेहमूद बेग,द्वारकाबाई पहिलवान,सुरेश बोडखे,यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.


