शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी, परभणी
सेलू : सेलू तालुक्यातील हिस्सी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाचे उमेदवार जयश्री गोरे यांचा विजय. हिस्सी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज दिनांक 6 नोव्हेंबर सोमवार रोजी सकाळी लागला असून सरपंच पदाचे उमेदवार जयश्री दीपक गोरे व अश्विनी विठ्ठल मगर यांच्यामध्ये सरळ लढत झाली असून जयश्री दीपक गोरे यांना 805 मते मिळाली तर अश्विनी विठ्ठल मगर यांना 503 मते मिळाली. जयश्री दिपक गोरे यांनी 805 मते मिळून दणदणीत विजय प्राप्त केला. काल पंधराशे तिस पैकी तेराशे सतरा मतदान झाले होते. विजयी उमेदवार गोरे आर्चणा धोंडिराम, मगर संपत रामभाऊ, गोरे अहिल्या साळकीराम,कवडे सुदमाती भीमराव,शिंदे माणिक रामा ,मगर सुदाम यादवराव ,
साळवे सुनीता धम्मपाल हे हिस्सी ग्रामपंचायत सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आ मेघना दीदी बोर्डीकर यांनी केला. यावेळी डॉ संजय रोडगे, दत्ता कदम, कपिल फुलारी, खाजा बेग,दत्ता तांबे, पठाण लालू खान, सह आदींची उपस्थिती होती.